26/09/2026
विश्वासाच्या बळावर यशाची वाटचाल; खानापूर शाखेचा १२ वा वर्धापन दिन उत्साहात
📍खानापूर (जि.सांगली)
खानापूर शाखेचा १२ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. ग्राहकांचा दृढ विश्वास, तत्पर सेवा आणि सातत्यपूर्ण प्रगतीच्या बळावर शाखेने बारा वर्षांच्या यशस्वी वाटचालीत भक्कम व्यवसाय उभा केला आहे. सद्यस्थितीत शाखेच्या ठेवी ४७ कोटी २८ लाख रुपये, कर्जे १६ कोटी ८६ लाख रुपये असून एकूण व्यवसायाने ६४ कोटी १४ लाख रुपयांचा टप्पा गाठला आहे.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या आजवरच्या वाटचालीसह ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व योजनांची माहिती देण्यात आली. आधुनिक व डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक जलद, सुलभ आणि विश्वासार्ह सेवा देण्याबरोबरच लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक वयोगटाच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन विविध बचत, ठेव व कर्ज योजना उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याप्रसंगी जगदीश टिंगरे, शिवाजी पवार, अरुण माने व सुखदेव भोसले यांनी आपल्या मनोगतातून शिवप्रताप मल्टीस्टेटच्या कार्याचे आणि खानापूर शाखेकडून दिल्या जाणाऱ्या ग्राहकाभिमुख सेवांचे कौतुक केले. गेल्या बारा वर्षांत शाखेने परिसरातील ग्राहकांशी विश्वासाचे नाते निर्माण करत आर्थिक गरजांच्या वेळी तत्पर सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शाखेने केलेली ६४ कोटी १४ लाख रुपयांची व्यावसायिक वाटचाल ही ग्राहकांनी संस्थेवर दाखविलेल्या विश्वासाची पावती असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे खानापूर शाखेने आजचा हा यशस्वी टप्पा गाठला असून आगामी काळात अधिकाधिक आधुनिक सेवा आणि ग्राहकाभिमुख योजनांच्या माध्यमातून हा विश्वास आणखी दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेला खानापूर शाखेचा १२ वा वर्धापन दिन सर्वांसाठी संस्मरणीय ठरला.
BusinessGrowth DepositGrowth LoanBusiness ModernBanking DigitalBanking CustomerService CooperativeSuccess TrustAndService GrowingTogether ShivpratapFamily
ShivpratapMultistate KhanapurBranch 12thAnniversary BusinessGrowth trustandservice