"मनी अॅकॅडमीची" सुरुवात १२/११/२०१३ रोजी श्री. आकाश गोंदावले यांनी केली. आकाश सर हे बीड-मराठवाडा येथून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले. त्यांनी व्यवसाय सुरु केला. शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी व्यवसायाबरोबर शिक्षण सुरु केले. परंतु जे काही ते शिकत होते त्याचा व्यावहारिक जीवनात काहीही उपयोग होत नव्हता. मग त्यांनी रिसर्च केला कि ज्या लोकांनी भरपूर शिक्षण घेतले आहे त्याची आत्ताची परिस्थिती काय आहे आणि त
्यांना असे लक्षात आले कि जे भरपूर शिकलेत आणि जे काहीच शिकलेले नाहीत त्याची महिना अखेर कमी अधिक प्रमाणात समान स्थिती आहे. पगार जास्त कमावणारा आणि कमी कमावणारा नेहमीच पैश्याच्या अडचणीत आहेत. पगार वाढणे किंवा जास्त काम करणे याने सुद्धा ही अडचण सुटत नाही. सरांनी मग रिसर्च सुरु ठेवला जीवनात कोणते ज्ञान असल्यास आपण जीवन सुखी, समाधानी, आनंदी आणि यशस्वी होऊ शकतो. वेगवेगळे प्रयोग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सरांना योग्य आणि प्रक्टिकल मार्ग सापडला. त्या माध्यमातून सर स्वतः वयाच्या २७ व्या वर्षी आर्थिकदृष्ट्या निवृत्त झाले. कसलिही संपत्ती खिश्यात नसताना २००२ साली सुरुवात करून सर २००९ साली निवृत्त होते. या मध्ये सरांनी कोणताही ओव्हर टाईम, पार्ट टाईम, मल्टीलेव्हल मार्केटिंग केले नाही. त्यांनी फक्त आणि फक्त जे काम ते करत होते तेच काम करून हे सर्व मिळवले. आपण समाजाचं काही देणे लागतो. आपला समाज, देश समृद्ध व्हावा या स्वयं प्रेरणेने ते हे ज्ञान देत आहेत. त्यांना भारतात आर्थिक साक्षरतेची क्रांती करायची आहे. भारताला महासत्ता बनवायचे असेल तर आर्थिक साक्षरते शिवाय हे कधीच शक्य नाही. त्यासाठी मनी अॅकॅडमी प्रयत्न करत आहे. याच संकल्पनेतुन मनी अॅकॅडमीची सुरूवात झाली.