15/06/2015
रिलायन्स रिटायरमेंट (निवृत्ती) फंड
करबचत + पेन्शन योजना
गेल्या काही वर्षात बेसुमार वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाचे जीवन अधिकच अडचणीचे झाले आहे. या महागाईच्या दुष्टचक्रात अडकलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनाची होणारी ससेहोलपट तर खरोखरच पाहवत नाही. पूर्वी बऱ्याच नोकरदारांना भविष्य निर्वाह निधीचे अर्थात पीएफचे व सरकारी नोकरदारांना पेन्शनचे कवच होते. परंतु, बदलत्या काळात गुंतवणुकीचे सर्वच पारंपरिक संदर्भ मागे पडत चालले आहेत. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला आपले आर्थिक नियोजन करणे ही काळाची गरज झाली आहे.
दिवसेंदिवस वाढणारी महागाई भाज्या, फळे, प्रवासाचा खर्चच नाही, तर औषधोपचारांसाठी लागणारा खर्चही वाढतच चालला आहे. एका बाजूला खर्चाचे आकडे फुगत असताना, दुसरीकडे व्याज दराने मात्र त्यांची निम्न पातळी केव्हाच गाठली आहे. परिणामी विविध प्रकारच्या बचत- गुंतवणूक- ठेवींवरील व्याजांतून मिळणारे उत्पन्न आता आकर्षक राहिले नाही. याचा सर्वाधिक फटका दरमहा निश्चित उत्पन्न प्राप्त होणा-या निवृत्ती वेतनधारकांना, ज्येष्ठ नागरिकांना बसतो. सध्या ज्येष्ठ नागरिक याच विवंचनेत असल्याचे आढळते.
वाढलेली महागाई आणि घटलेले व्याजदर यांनी गुंतवणुकीचे पर्याय फारच मर्यादित केले आहेत. गरजेनुसार पैसे तात्काळ उपलब्ध करून देणारी गुंतवणुकीची रोखता किंवा रोकड सुलभता राखणे आणि त्याचबरोबर भाववाढीला समर्थपणे तोंड कसे द्यायचे हा खरा तर यक्षप्रश्नच म्हणावा लागेल.
निवृत्त गुंतवणूकदारांनी तीन प्रश्न विचारून गुंतवणूकविषयक उत्पादनांची नेहमी परीक्षा करावी
खर्चाच्या तुलनेत रिटर्न किती मिळतील?
रिटर्न मिळवण्यासाठी किती काळ गुंतवणूक सुरू ठेवावी लागेल?
गुंतवणूक पर्यायात बदल करण्यासाठी लवचिकता किती आहे?
निवृत्तीच्या वेळी भविष्य निर्वाह निधी व इतर आर्थिक रक्कम एकरकमी हातात पडते. दर महिन्याच्या महिन्याला मिळणा-या मासिक पगाराचे उत्पन्न बंद झालेले असते. त्यामुळे गुंतवणूकीतून मिळणा-या व्याजातूनच खर्च करायचे आहेत, कारण, खर्च कुठूनही कमी झालेले नसतात. एखाद्या जीवनशैलीचा स्वीकार केल्यानंतर त्याच पद्धतीने राहण्याची सवय सहजासहजी मोडता येत नाही. त्यासाठी तडजोड करता येत नाही. त्यामुळे तरुणपणापासूनच निग्रहाने व सातत्याने केलेली गुंतवणूक व त्यातून योग्य परतावा मिळाला तरच आर्थिक आरोग्याचा समतोल राखणे शक्य होऊ शकते.
निवृत्तीचा काळ सुखात जावा असे वाटत असेल, तर योग्य नियोजनाला पर्याय नाहीचं. त्यामुळे वयाच्या पंचविशी-तिशीतच निवृत्तीवेतनाची तरतूद करून ठेवणे, हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
बरेच जणाना पेन्शन नसते. परिस्थिती वाईट आहे. अशा वेळी आपल्यासारख्या तरूण पिढीवर ३ प्रकारच्या जबाबदा-या आहेत.
१) आपल्या आई-वडिलांची जबाबदारी (कारण ब-याच महाराष्ट्र राज्य कर्मचा-याना पेन्शन मिळत नाही)
२) आपली स्वतःची आणि आपल्या जीवनसाथीची आताची आणि रिटायरमेंट नंतरची तजवीज, आजचे खर्च, विमा.
३) आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षण-आरोग्य-भविष्य इ. गोष्टींसाठीची तजवीज अशा वेळी नेमकी कुठे, किती, कशी गुंतवणूक करावी काही कळेनासे झाले आहे. काय आणि कितीही केले तरी १०-२० वर्षांनी त्याची काही मोलच उरणार नाही असे वाटू लागले आहे
बचतीची आवश्यकता
बचत म्हणजे खरेदीसाठी केलेली लहान योजना, अचानक उद्भवणा-या प्रसंगासाठी, उसनवारी न करता खरेदी करण्यासाठी आणि इतर खर्चासाठी केलेली आर्थिक तरतूद. गरजेच्या वेळेसाठी अधिक पैसे आपल्याकडे आहेत ही भावना डोकं शांत ठेवते आणि उसनवारी न करता खर्च करण्याची क्षमता देते म्हणून बचत आवश्यक आहे. निवृत्त जीवनाचा आनंद घेण्यासाठी आताच बचतीची सुरुवात करा. जरी तुम्हाला वाटलं की तुम्हाला हे जमणार नाही तरी. जरी याचा आवक लहान असली तरी.
तुमच्या कार्यकाळातील ७० टक्के रक्कम ही तुमच्या निवृत्तीनंतर समाधानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असते हे तुम्हाला माहित आहे का?
दूर कुठे फिरायला जाणं किंवा बोटीच्या डेकवरच्या खुर्चीत रेलून बसणं अशी स्वप्न बघण्याआधी तुमच्या घराचं भाडं, आहार, आरोग्य अशा मुलभूत गोष्टींचा विचार करा. तुमचे उद्देश वास्तवाला धरून असू द्या, त्याप्रमाणेच तुमची निवृत्तीचे धोरण आखा. निवृत्ती आधीच याची सुरुवात करणं कधीही चांगलच. पण अजून तुम्ही सुरुवात केली नसेल तर तुम्ही आत्ताही बचत करू शकाल.
निवृत्तीचे नियोजन कदाचित सर्वात महत्वाचे जीवन उद्दिष्ट आहे. जितक्या लहान वयात तुम्ही बचत करायला सुरुवात कराल तितकं उत्तम. यामुळे तुम्हाला बचत करायला बराच वेळ मिळतो. निवृत्तीनंतर मिळणा-या आपल्या ठेवी जोखीम रहित आणि सुरक्षित राहाव्या, तसेच त्यातून चांगला परतावा मिळावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. मात्र, सुरक्षित ठेवींवर मिळणारे व्याज नेहमीच कमी असते, तर अधिक व्याज देणा-या ठेवी सुरक्षित असतीलच याची खात्री देता येत नाही. असे असले, तरी सध्याच्या काळात अधिक परतावा(रिटर्न्स) मिळविण्यासाठी या प्रकारचा काहीसा जोखमीचा मार्ग निवडण्याला काही निवृत्तीधारक प्राधान्य देताना दिसतात. अर्थातच, अशा निवृत्तीधारकांची संख्या अगदी नगण्य असली, तरी त्यानिमित्ताने अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना आकर्षित करून घेण्यासाठी म्युच्युअल फंडांकडून देखील बँकेच्या दरांपेक्षा हे दर दोन ते तीन टक्क्यांनी अधिक असल्याने अधिक परतावा मिळविण्यासाठी काही जण त्यामध्ये गुंतवणूकही करतात. नियमित उत्पन्न देणा-या या योजना मुदतीपूर्वी खंडितही करता येऊ शकतात. या सर्व योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे अधिक फायद्याचे ठरते. पाच वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी अशा योजनांमध्ये केलेली गुंतवणूक अधिक आकर्षक परतावा मिळवून देते.
रिलायन्स म्युच्युअल फंडांकडून देखील अनेकविध कालावधीच्या योजना आणल्या गेल्या आहेत. यात केली जाणारी गुंतवणूक कोणत्या ठिकाणी केली जाणार आहे, ती किती प्रमाणात असेल, याची माहिती प्रारंभीच करून घेतली, तर हितावह ठरते. या प्रकारच्या योजनेतून मुदत ठेवींवरील उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न मिळत असते. म्युच्युअल फंडातून मिळणारे लाभांशाचे उत्पन्न करमुक्त असते.
मूलत, आपण पुढील 30 वर्षे फायदे आनंद करण्यासाठी पहिल्या 30 वर्षांतच आपली मालमत्ता तयार!
आपले पालक आर्थिक दृष्टीने सक्षम असण्यास आपण जवाबदार असल्यास, आपली भूमिका उत्तम प्रकारे वठविण्यासाठी रिलायन्स निवृत्ती फंड आपल्याला मदत करू शकेल.
यामधे कोण गुंतवणूक करू शकतो:
खालील व्यक्ती युनिट सदस्यता पात्र आहेत (जेथे जेथे संबंधित, युनिट खरेदी करण्यासाठी आपापल्या घटना आणि संबंधित राज्य कायद्याखाली परवानगी जात):
एकच किंवा संयुक्तपणे (तीन पेक्षा जास्त नाही) प्रौढ निवासी भारतीय व्यक्ती,.नॉन - निवासी भारतीय आणि संपूर्ण मायदेशी परतण्याची आधारावर, परदेशात राहणा भारतीय वंशाच्या व्यक्ती अज्ञान वतीने पालक / कायदेशीर पालक हा फंड, सेबीच्या नियमांनुसार आणि इतर प्रचलित वैधानिक नियमांच्या अधीन योजना, गुंतवणूक गुंतवणूकदारांना नवीन / विद्यमान श्रेणी / समावेश वगळण्याची अधिकार राखून ठेवत आहे.
सध्या, व्यक्ती आयकर कायदा, 1961 च्या आयकर अधिनियम 80 क पात्र.
गुंतवणूकदार त्यांच्या प्रत्यक्ष गुंतवणूक आवश्यकता भागविण्यासाठी अशा ऑटो हस्तांतरण योजना, (नियमित जमा योजना) फंड सुविधा वापरू शकतो. ही सुविधा व अधिक माहितीसाठी, योजना माहिती दस्तऐवज पहा.
रिलायन्स निवृत्ती फंड युनिट वाटप तारखेपासून योजना पाच वर्षांच्या लॉक-इन-कालावधीनंतर एनएव्ही आधारित दरांमध्ये सर्व व्यवसाय दिवस सुविधा उपलब्ध आहे. माञ वय 60 वर्षे आधी रिलायन्स निवृत्ती फंडवर 1% एक्झिट लोड होईल याची नोंद घ्यावी.
१२/०६/२०१५ रोजी संपत्ती निर्मिती योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य (NAV) रु. ९.५३३३ तर उत्पन्न योजनेचे निव्वळ मालमत्ता मूल्य रु. ९. ७९९० असे आहे.
खालील 2 निवृत्ती योजना गुंतवणूकदारांना योग्य असू शकते:
1. रिलायन्स निवृत्ती फंड - संपत्ती निर्मिती योजनामध्ये गुंतवणूकदार मदत म्हणून निश्चित उत्पन्न सिक्युरिटीज प्रामुख्याने इक्विटी आणि इक्विटी संबंधित उपकरणे आणि शिल्लक गुंतवणूक • दीर्घ मुदतीच्या वाढ आणि भांडवल जमा उच्च धोका (तपकिरी)
2. रिलायन्स निवृत्ती फंड - उत्पन्न योजना: इक्विटी आणि इक्विटी संबंधित साधने राजधानी वाढ प्रामुख्याने निश्चित उत्पन्न सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक आणि शिल्लक दीर्घकालीन प्रती उत्पन्न मध्यम धोका निवृत्ती साध्य मध्ये गुंतवणूकदार मदत म्हणून (पिवळा)
टीप: धोका म्हणून प्रस्तुत केले आहे:
(निळा) गुंतवणूकदारांना कमी धोका होईल, असे समजू
(पिवळा) गुंतवणूकदारांना मध्यम धोका असेल, असे समजू
(तपकिरी) गुंतवणूकदारांना उच्च धोका असेल, असे समजू
म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजारात जोखीम अधीन आहेत, काळजीपूर्वक सर्व योजना कागदपत्रे वाचा.
इतर आवश्यक माहितीसाठी 09004357631 एसएमएस करा किंवा [email protected] येथे ई-मेलवर किंवा facebook वर "RAJAN DEOLEKAR" वर आम्हाला massage लिहा.