01/09/2022
*भारतीय आयुर्विमा महामंडळ*
दि.१ सप्टेंबर १९५६ रोजी आपल्या LIC चे राष्ट्रीयीकरण झाले. आज त्याला ६६ वर्ष पूर्ण झालीत. त्यानिमित्त आपणा *सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा...!!!*
१ सप्टेंबर १९५६ ते १ सप्टेंबर २०२२ असा खुप मोठा यशस्वी आणि वैभवशाली प्रवासाचा टप्पा पार केला आहे.
लाखो विमा प्रतिनिधी,हजारो विकास अधिकारी,इतर सर्व कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी या सर्वांच्या कष्टातून आजचे हे यश आणि वैभव पहायला मिळतंय.आणि त्यामुळेच आज LIC जगातील क्रमांक १ ची आयुर्विमा संस्था बनली आहे.
या प्रवासात अनेक स्थित्यंतरे पाहायला मिळाली आणि आपल्याला अजूनही सतत नवनवीन बदलांना सामोरे जात असतांना *ग्राहक हा राजा* आहे हे लक्षात ठेऊन,त्याला सेवासंतुष्टी देऊन,आजच्या या स्पर्धेच्या युगात अनेक नवनवीन यशोशिखरे गाठायची आहेत.
चला तर मग आज आपण सर्व LIC'AN हे शिवधनुष्य पेलण्यासाठी व अनेक आव्हानात्मक गोष्टींचा प्रत्यक्ष सामना करण्यासाठी सज्ज होऊ या.....
*पुनश्च वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!*🙏