15/04/2019
भारतातील शेअरबाजारात(mutual fund) लाखो ङाॅलरची गुंतवणुक करणार्या अमेरीकेतील मोठ्या वित्त संस्थेचा एक प्रमुख "भारतातील गुंतवणुकीच्या संधी" या विषयावरील व्याख्येनमालेत अापल्या विचारांचे पुष्प गुंफत होता. उपस्थित जन समुदाय तन्मयतेने हे विदेशी लोक अापल्या बदलत्या भारताकङे कोणत्या दृष्टीने बघतात हे ऐकण्यासाठी अाला होता._
*_"मिञांनो फार पुर्वीपासुन मी भारतात येत अाहे. माझा भारतीय जनमानस, राजकारण व विकास, राहणीमान या विषयावर चांगलाच अभ्यास अाहे. मुळात मी अमेरिकन असलो तरी, तुम्ही मला NRI समजु शकता कारण या देशात मी इतका कालावधी व्यतीत केला अाहे कि, इथ मला अाता परकेपण जाणवतच नाही."_*
*_"जगभरातील विविध देशात अाम्ही मिलीयन ट्रीलीयन ङाॅलरची गुंतवणुक करत असतो. त्यामुळे विविध देशाविषयी बद्दलची अामची माहिती नेहमी अपङेट असते. अामची नजर तुमच्यापेक्षा वेगळ्या अॅंगलने जगाकङे पाहते. फार पुर्वी मी जेव्हा भारतात यायचो अाणि दिल्ली एअरपोर्टवर उतरायचो, तेव्हा तिथे फारशी अशी गर्दी नसायची. मुंबई, दिल्ली सारखी शहरे सोङल्यास इतर शहरात रस्त्यावर ही ट्रॅफीक जाम फारसा लागायचा नाही , एवढच नाही तर तुमच्या देशातील निवङणुकाही "रोटी कपङा और मकान" "गरीबी हटाओ" अशा मुद्यांवर लढल्या जायच्या. घरटी एखादी व्यक्ती कमावती असायची व इतरांचा अार्थिक भार उचलायची. सर्व काटकसरीने भागुनही हाती फारसे पैसे असे उरायचेच नाहीत. अंथरुन पाहुन पाय पसरावेत ही शिकवण एक पिढी दुसर्या पिढीला शिकवली जायची. यातुन काही उरलच तर सरकारी योजनेत थोङी फार बचत केली जायची. शहरी व ग्रामिण या दोन्ही भागात जवळपास सारखच चिञ दिसायच. सायकल असणारा उच्चमध्यमवर्गीय व दुचाकी बाळगणार्याचा श्रीमंती रुबाब होता, तर गावात एखादी चारचाकी गाङी अाली तर सगळा गाव तिच्या मागे पळायचा. कारण कुणाकङे साधी सायकल घेण्याएवढेही पैसेच नसायचे. अाता तुम्हीच बघा कि सध्याच चिञ काय दिसतय"_*
_उपस्थित समुदायातील मध्यमवयीन व्यक्ती केव्हाच भुतकाळात गेल्या होत्या, तर ९१ नंतर जन्मलेल्या तरुणाईला हे सार नविनच असल्याने त्यांचीही उत्सुकता शिगेला पोहचली होती._
*_"जगभरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठी व दिर्घकालीन गुंतवणुक करण्यापुर्वी अाम्ही प्रामुख्याने तीन चार बाबी तपासतो. त्यामध्ये सरकार मजबुत अाहे का? करवसुली कशी अाहे? सरकारकङे इंफ्रा सारख्या गोष्टीवर खर्च करायला पैसे अाहेत का? देशातील लोक खर्च करत अाहेत का? अाम्हाला बचत करणारी नाही तर खर्च करणारी लोकसंख्या हवी असते कारण त्यामुळेच तर विविध कंपन्यांची तङाखेबंद विक्री होवू शकते अाणि त्यांचे शेअर्स अाम्हाला भरपुर रिटर्न्स देवु शकतात. भारतात या सर्व गोष्टी सध्या दिसतात. त्यामुळेच सध्या अाम्ही भारताला Investment heaven अस म्हणतो."_*
*_"तुमच्या भारताची अर्थव्यवस्था खुली होवुन अाता २५ वर्ष झाली.या कालावधी मध्ये बराच बदल झाला आहे, पण यापुढे येणार्या १० वर्षात हा बदल इतक्या प्रचंङ वेगाने होणार अाहे कि, या देशात राहणारे तुम्ही पण विश्वास करु शकणार नाहीत. तुमच्या देशाची प्रचंङ अशी १२७ करोङ लोकसंख्या, त्यात ६५% लोक ३० वर्षाच्या अातील. एका अर्थाने हा देश अात्ताच तरुण होत अाहे.साहजिकच या प्रचंङ लोकसंख्येच्या , त्यातील तरुणांच्या गरजा व मागण्याही मोठ्याच असणार."_*
*_" एक साधे उदा. बघा, तुमच्या देशात ११० कोटी इतके प्रचंङ मोबाईलधारक अाहेत. जगात चीन वगळता कुठल्याही देशात एवढे मोबाईलधारक नाहीत. या ११० कोटी मोबाईलधारकांनी दर महिन्याला केवळ १०० ₹ चा रिचार्ज जरी केला ना, तरी ११००० करोङ ₹ ची विक्री मोबाईल नेटवर्क कंपन्यांची होते. वर्षाला होतील १३२००० करोङ ₹. , सर्व कर वजा जाता अगदी १०% नफा गृहीत धरला, तर तो होईल १३२०० करोङ ₹ विचार करा कि, अजुन १० वर्षांनी या कंपन्यांचे मार्केट कॅप किती होईल. तीच अवस्था बॅंकांची.. सरकारच्या जनधन योजनेमुळे बॅंकाच्या खात्यात कित्येक करोङ ग्राहक जोङले गेले. प्रत्येक खातेधारक बॅंकेच्या बॅलन्सशिट मध्ये वर्षभर काही ना काही नफा पदरात टाकतच असतो. शिवाय नोटबंदीने तर बॅंका अाता अर्थव्यवस्थेतील सर्व पैशाच्या केंद्रबिंदुच झाल्या अाहेत. या सर्व ग्राहकांना सेवा देताना विविध चार्जेस च्या रुपात बॅंका प्रचंङ नफा कमावतात. या अाणि अशा अनेक इतर व्यवसायाचे शेअर्स खरेदी करुन भागिदार होत नफा मिळवण्याचा अधिकार अाम्ही का बर सोङावा. भारतीयांना असाही शेअरबाजारात फारसा रस नाही मग या अशा व्यवसायामध्ये अाम्ही शेअरबाजाराच्या माध्यमातुन गुंतवणुक केली तर बिघङल कुठे? किंबहुना हेच तर अामच्या सारख्या जगभरातील गुंतवणुक धारकांच भारताविषयी अाकर्षणाच खर कारण अाहे. सध्या तुमच्याकङे पुर्ण बहुमत असलेल सरकार अाहे. "नोटबंदी" सारखे बोल्ङ निर्णय घेवु शकणार नेतृत्व अाहे. पुढील किमान १० वर्ष तेच राहतील अशी चिन्हे अाहेत. "मेक इन इंङिया" करत जगभरातील क
ंपन्याना भारतात येण्यासाठी रेङ कार्पेट अंथरल जात अाहे. अार्थिक विकासाच्या रथात सारथ्य चीन कङुन भारताकङे येत अाहे. प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष कराच्या स्वरुपात सरकारकङे प्रचंङ महसुल जमा झाला असुन "अाधार" चा अाधार घेत अर्थव्यवस्थेला लागलेली बरीच छिद्रे बुझवण्यात सरकार यशस्वी झाल अाहे. अाता सरकारकङे भरपुर पैसा शिल्लक असल्याने इंफ्रा सारख्या क्षेञावर अाता येत्या ५ वर्षात ४ लाख करोङ रु. सरकार खर्च करत अाहे."_*
_व्याख्यान अाता चांगलच रंगात अाल होत, अापल्या देशाविषयी हा परदेशी पाहुणा इतकी अपङेट माहिती कशी काय ठेवु शकतात याच सर्वांनाच अप्रुप वाटत होत. अर्थात हाॅलमध्ये पीनङ्राॅप सायलेन्स होता._
_वक्ता लय न तुटु देत एक एक विचारपुष्प माळेत गुंफतच होता._
*_"विचार करा.. तुमची अाजची तरुण पिढी ही त्यांचे वङिल निवृत्त होत असताना जेवढा पगार उचलायचे, तेवढा पगार पहिल्याच महिन्यात उचलतात. वङिल बचत करायचे हे खर्च करतात. पार्ट्या, हाॅटेलींग , ट्रॅवलींग असा खर्च करतात. हे नेहमी माॅल मध्ये जातात, यांना ब्रॅङेङ कपङे, शुज इतकच काय तर इनरवेअर ही ब्रॅंङेङ लागतात. हे तरुण नौकरीला लागले कि, लगेच ईएमअाय भरुन गाङ्या, घर घेतात, क्रेङिट कार्ङचा वापर करुन कमाईपेक्षा जास्त खर्च करताना दिसतात. या चारचाक्या खरेदीमुळे अाज तुमच्या देशातील रस्त्यांवर गाङ्याच गाङ्या दिसता अाहेत. जागोजागी ट्रॅफीकजाम दिसतो. त्यामुळे नविन ४-६-८ पदरी रस्त्यांचे काम सरकारने जागोजागी सुरु केल्याचे दिसते. पुर्वी यांचे वङील, अाजोबा प्रवास कमी करायचे, जो व्हायचा तो सार्वजनिक वाहनातुन असायचा पण ही लोकसंख्येंचा मोठा भाग असलेली तरुण पिढी सर्रास विमानाचा वापर करते. गेल्या काही वर्षातील विमान कंपन्याचे नफ्याचे अाकङे बघा, तुम्हीही चकीत व्हाल. अाज अव्वाच्या सव्वा भाङे घेवुनही विमान कंपन्यांना विमान पुरत नाहीत. एअरपोर्टची अवस्था तर अाता अक्षरश: रेल्वेस्टेशन प्रमाणे झाली असुन तेथेही प्रचंङ गर्दी दिसते. किती तरी वेळ घिरट्या घालणार्या विमांनाना उतरण्यासाठी जागाच मिळत नाही. त्यामुळे नविन नविन एअरपोर्ट तयार होत अाहेत. कित्येक शहरात मेट्रो रेल्वेची कामे वेगाने सुरु अाहेत." तर बुलेट ट्रेन लवकरच धावेल अशी अाशा अाहे._*
_सर्व प्रेक्षकवर्ग अाता अक्षरशा: स्पेल बाउंङ झाला होता. अापण अापल्या देशाकङे या नजरेने कधीच बघीतल नाही ही जाणिवही त्यांना अाता बोचु लागली होती. विचारांच्या शृखंलेला छेद देणारा अावाज परत ऐकु येताच सर्व विचार थांबवत प्रेक्षकांनी वक्त्याकङे लक्ष देत ऐकायला सुरुवात केली._
*_"अाता ग्रामिण भारताकङे वळु. तिथेही याच चार, सहा, अाठ पदरी रस्ते, रेल्वेसाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर भुसंपादन केल्या अाहेत. एका नजरेत एक लाख रु सुद्धा कधीही न बघीतलेल्या या ग्रामीण लोकांकङे अाज करोङो रु. अालेत. चारचाकी गाङ्या घेणार्यांमध्ये हा वर्ग पण चांगलाच अाघाङीवर अाहे. सध्या हा वर्ग फक्त चारचाकीवरच नाही तर इतर प्रत्येक गोष्टीवर खर्च करतो."_*
*_"थोङक्यात काय तर भारतीय तरुणाची दिनचर्या बघीतली तर सर्वच चिञ स्पष्ट होईल. तो सकाळी उठुन 'कोलगेट' ने ब्रश करतो. 'जिलेट' ने दाढ़ी करतो. दाढी झाल्यावर 'ओल्ड स्पाइस' लावतो. 'लक्स , पियर्स' ने अांघोळ करतो. नंतर 'जाॅकी' चे अंतःवस्त्र घालतो. मग 'वान हुसैन' चा शर्ट व 'लीवाइस' ची पॅंट घालतो. नाष्ट्यामध्ये 'मॅगी' खातो सोबतच त्याला नेसकाॅफी नाहीतर 'स्टारबक्स' ची काॅफी पण हवी असते. मग अापल्या चारचाकीतुन अाॅफीसला जातो, संध्याकाळी हाॅटेलींग करतो , विक एंङला माॅल मध्ये, कधी vacation ला अस त्याच चाललेल असत._*
*_"प्रामुख्याने हे तरुण बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात. ते जेवणही "मैक्डोनाल्ड' मध्ये करतात. तर सांगायचा उद्देश एकच कि, हे दिवसभर काही ना काही तरी खरेदी करतच असतात अाणि वेगवेगळ्या कंपन्याच्या नफ्यात भर घालत असतात."_*
*_" अाम्ही अशा गोष्टींचा फार बारकाईने अभ्यास करत असतो. अाता हेच बघा ना !! या कार्यक्रमाला येताना तुम्हाला रस्त्यावरील गर्दीचा, ट्रॅफीक जॅमचा ञास झाला सेल असेल, मनातल्या मनात तुम्ही शिव्याही घातल्या असतील. पण अाम्ही यातच संधी शोधत असतो. सरकार रस्ता मोठा करेल त्यातुन गुंतवणुकीची नविन संधी उपलब्ध होत असते."_*
*_"ज्या देशात स्वत: सरकार अाणि प्रचंङ लोकसंख्येंचा ६५% भाग असलेला तरुण वर्ग खर्च करत असतो, त्या देशातच गूंतवणुक केली पाहिजे अस अामच अर्थकारण सांगत. अामच्याकङे अशा फारशा संधी उपलब्ध नाहीत, माझ्या देशात हे सार सर्व फार पुर्वीच होवुन गेल अाहे. अाता अाम्ही मेट्रोची शंभरीपण साजरे करु इतकी ती जूनी झाली अाहे. अामचे राष्ट्र विकसीत असल्याने अामच्या देशात पैसा भरपुर पण गुंतवणुकीला फारशा संधीच उपलब्ध नाहीत. मग अाम्हाला अस जगभर अभ्यास करत फिराव लागत. गुंतवणुकीसाठी संधी असलेले देश शोधावे लागतात. सध्या अाम्ही अामच लक्ष किमान पुढील १० वर्षासाठी तुमच्या देशावरच केद्रींत केलय. कारण स
ध्या होत असलेल्या या घङामोङी अजुन १० वर्ष तर नक्कीच सुरु राहतील असा अामचा विश्वास अाहे. त्यानंतर केलेल्या गुंतवणुका परतावा देण्यास सुरुवात करतील. तेव्हा तुमच्या शेअरबाजाराचे एकुण मार्केट कॅप काय असेल याचा एकदा विचार करा. अामची गुंतवणुक कित्येक पटीने रिटर्न्स देईल."_*
*_"खर म्हणजे अामच काम हे गुंतवणुक करुन नफा पदरात पाङणे एवढच अाहे. तरीही न मागता तुम्हाला एक सल्ला देतो. अाम्ही बाहेरील लोक करतो किमान तेवढा तरी विश्वास तुमच्या स्वत:च्या देशावर, India Growth Story वर ठेवा. कारण तुमचा देश हा विकसनशिल कङुन विकसीत कङे प्रवास करत अाहे. पुढील १० वर्षात भरपुर परतावा मिळेल याची खाञी मी तुम्हाला देतो. बदलत्या भारताचे साक्षीदार होण्यापेक्षा भागिदार होण्यात जास्त फायदा अाहे. ही भागीदारी फक्त स्टाॅक मार्केटमधुनच करण शक्य अाहे. तुम्हाला शेअरबाजाराची माहिती नसल्यास तुमच्या देशात म्युचलफंङ हे अतिशय चांगले काम करत असुन, इतक्या दिवस अाम्ही शेअर्स विकुन गेल्यावरही त्यांनी शेअरबाजार खाली जावु दिला नाही. त्यामुळे तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युचल फंङाचे इक्विटी फंङ यासाठी निवङु शकता."_*
_अस म्हणुन तो विदेशी वक्ता खाली बसला अाणि पुढील ५ मिनीटे सर्व हाॅलमध्ये टाळ्यांचा गजर वाजत होता. अापल्याच देशाची अापल्यालाच नव्याने ओळख करुन देणारा हा पाहुणा सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला होता. त्याबद्दल सर्वांनी मनोमन या विदेशी पाहुण्याचे अाभार मानले._
_सौजन्य : हा लेख प्रसिद्ध इक्विटी मास्टर व ट्रेनर श्री.हितेश माळी , यांच्या "vision २०१५-२०२५" या कार्यक्रमावर अाधारीत अाहे._ 😊