27/07/2024
पटलं तर शेअर करा,
भारतीय कुटुंबामध्ये साधारण चार ते पाच लोक असतात. नवरा, बायको, एक किंवा दोन मुले व आजी आजोबा, यामध्ये कमावती व्यक्ती एक किंवा दोन असतात. घरातील कोणताही निर्णय घेताना सगळ्यांची मते विचारली जातात पण निर्णय मात्र कमावणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार होतो. कुटुंबामध्ये कमावणारी व्यक्ती एक किंवा दोन पण खाणारे तोंडे चार ते पाच.
आज आपल्या देशामध्ये
शासन गरिबांसाठी खूप वेगवेगळ्या योजना आणत आहे. रेशन कार्ड वर खूप कमी दरामध्ये धान्य मिळत आहे वेगवेगळ्या योजनांमधून वेगवेगळे अनुदान मिळत आहेत. तसेच आता नवीनच सुरू झालेले लाडकी बहीण योजना सहज सुरू झालेली आहे त्याचबरोबर विकासाची कामेही खूप होतात आणि ह्या सर्वांचा सर्वांचा होणारा खर्च हा शासन आपल्या तिजोरी मधून करत आहे त्या ज्या तिजोरी मध्ये शासन स्वतः पैसे छापून ठेवू शकत नाही. तो पैसा मात्र वेगवेगळ्या कर प्रणालीतून जसे की इन्कम टॅक्स, जी एस टी व तत्सम टॅक्सेस मधून हा पैसा येतो. सरकारच्या म्हणण्यानुसार हे टॅक्सेस बनणारे लोक अंदाजे आठ ते दहा करोड आहेत म्हणजे कमावणारे लोक हे आठ ते दहा करोड आहेत व याचा उपभोग घेणारे 140 करोड लोक आहेत. ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबामध्ये कमावणारे व्यक्ती एक किंवा दोन असतात व त्याचा उपभोग घेणारे चार ते पाच जण असतात.
आपल्या देशात ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस हे टॅक्स भरणारे खूप कमी लोक मतदानास जातात. भारत देशातील 18 वर्षावरील कोणतीही व्यक्ती एक मत देऊ शकते भले तो टॅक्स भरत असेल किंवा नसेल. निवडणुकीमध्ये निवडून येण्यासाठी फक्त मतांची संख्या कोणाला जास्त आहे हे पाहिले जाते ते मत टॅक्स भरणार आणि दिले आहे हे तर कोणी दिले आहे हे पाहिले जात नाही.राजकारणी लोक या गोष्टीचा गैरफायदा घेऊन सामान्य गरीब लोकांना कवडी मोलाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या योजना देऊन त्यांचे मते मिळवून निवडून येतात. आणि येथूनच सरकारमध्ये भ्रष्टाचार व चुकीच्या गोष्टी सुरू होतात आणि आपण फक्त यावर चर्चा करतो की सरकार केव्हा सुधारणार, देश केव्हा सुधारणार.
जसे कुटुंबामध्ये कमावणाऱ्या व्यक्तीच्या मतानुसार सर्व गोष्टी होतात त्या पद्धतीने जर नवीन सरकार निवडताना फक्त टॅक्स भरणारेच मते मत देतील असे ठरले तर राजकारणी लोक गरीब लोकांना मतासाठी आम्ही ते दाखवू शकणार नाही तर तेच राजकारणी लोक टॅक्स भरणाऱ्या लोकांसाठी चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न करतील. सरकारच्या तिजोरीत येणाऱ्या पैशाचा योग्य वापर होईल व देशाला हितकारक असणाऱ्या योजनांवर जास्त खर्च होईल तसेच टॅक्स भरणाऱ्यांना सुद्धा फायदा होऊ शकतो. निवडणुकीमध्ये योग्य तो उमेदवार निवडून येण्याची शक्यता वाढेल.
वरील गोष्टीचा विचार करून प्रत्येक टॅक्स पेअर व आयटी रिटर्न भरणाऱ्यांनी सरकारला अपील केले पाहिजे की फक्त भरणाऱ्यांनाच निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार मिळावा.
पटलं तर शेअर करा,
दिपक चांगण मो. 7757082498