Shri Absolute Wealth Management

Shri Absolute Wealth Management SAWM secures and grows your wealth, guiding you to lasting financial success.

सेबी बोर्ड बैठक 17 डिसेंबर 2025 – गुंतवणूकदारांसाठी काय बदल?सेबीने 17 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या 212 व्या बोर्ड बैठकीत भ...
18/12/2025

सेबी बोर्ड बैठक 17 डिसेंबर 2025 – गुंतवणूकदारांसाठी काय बदल?

सेबीने 17 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या 212 व्या बोर्ड बैठकीत भारतीय भांडवली बाजार अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि गुंतवणूकदार-स्नेही करण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.

🔹 म्युच्युअल फंड नियम अधिक सोपे
नवीन सेबी (म्युच्युअल फंड) नियम, 2026 लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये नियमांची भाषा सोपी करण्यात आली असून गुंतवणूकदारांचे संरक्षण अधिक मजबूत केले आहे.
🔹 Expense Ratio मध्ये स्पष्टता
आता Base Expense Ratio मधून सरकारी कर व शुल्क वेगळे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष खर्च किती आहे हे अधिक स्पष्टपणे समजेल.
🔹 IPO माहिती अधिक समजण्यास सोपी
IPO साठी आता DRHP टप्प्यावरच संक्षिप्त (Abridged) प्रॉस्पेक्टस उपलब्ध होणार आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीबद्दल माहिती समजणे सोपे होईल.
🔹 भौतिक शेअर्ससाठी मोठा दिलासा
डुप्लिकेट शेअर, ट्रान्समिशन इत्यादींसाठी Letter of Confirmation प्रक्रिया रद्द करण्यात आली असून आता 30 दिवसांत थेट डिमॅट खात्यात शेअर्स जमा होतील.
🔹 कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक प्रोत्साहन
ज्येष्ठ नागरिक, महिला व किरकोळ गुंतवणूकदारांना कर्ज रोख्यांमध्ये अतिरिक्त व्याज किंवा सवलत देता येणार आहे.

👉 एकूणच, हे निर्णय गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवणारे असून दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करणारे आहेत.

Shrinivas Suresh Mulawar
AMFI Registered Mutual Fund Distributor ARN - 278375
SEBI Registered Trading Member Reg. No.: INZ000171337
Sub Broker/Authorized Person Reg. No.: AP2069587721

*Disclaimer*
Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.
Investments in securities market are subject to market risks, read all the related documents carefully before investing.

11/12/2025
07/12/2025
Proud to share that I have been awarded the Professional Certificate in Global Wealth Management by The Wealth Company &...
28/11/2025

Proud to share that I have been awarded the Professional Certificate in Global Wealth Management by The Wealth Company & PGP Academy.

Grateful for this recognition and excited to continue delivering excellence in wealth management.

10/10/2025

ULIP चा चमकदार मुखवटा… आणि त्यामागचं वास्तव!

गुंतवणूक करताना योग्य सल्लागाराचा सल्ला घ्या…

दररोज मी अनेक लोकांना भेटतो, कोणी गुंतवणुकीबद्दल विचारतो, कोणी विम्याबद्दल, तर कोणी दोन्ही एकत्र कसं करता येईल यावर चर्चा करतो. या संवादांमधून एक गोष्ट वारंवार समोर येते ते म्हणजे ULIP बद्दलचा गोंधळ अजूनही जिवंत आहे. तर आज जाणुन घेऊ या ULIP हे म्युच्युअल फंडपेक्षा चांगले आहेत कि हा भ्रम?

अनेकदा सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअॅपवर आपण असे चार्ट पाहतो, कि ज्यात लिहिलं असतं ULIP मध्ये विमा कव्हर, टॅक्स बेनिफिट, डिसिप्लिन, फ्लेक्सिबिलिटी, डेथ बेनिफिट सगळं मिळतं. वाचताना ते खरं वाटतं, कारण प्रत्येक मुद्दा तांत्रिकदृष्ट्या बरोबर असतो. पण खरी फसवणूक त्या गोष्टींमध्ये आहे, ज्या मुद्दाम लपवल्या जातात.

ULIP म्हणजे विमा आणि गुंतवणूक या दोन वेगळ्या असणा-या गोष्टी एकत्र करून विकण्याचं माध्यम. आणि हे एकत्र येतं तेव्हा फायदा कंपनीला होतो, गुंतवणूकदाराला नाही. हे कटु पण सत्य आहे. समजा तुमचं वय ३० वर्षे आणि वार्षिक उत्पन्न ₹१० लाख तर मग तुमच्या कुटुंबासाठी किमान ₹१ कोटीचं जीवन विमा कव्हर आवश्यक आहे. ULIP मध्ये ₹१ कोटीचं कव्हर घ्यायचं झालं तर दरवर्षी जवळपास ₹१० लाख प्रीमियम भरावा लागेल म्हणजे जवळपास संपूर्ण पगार! हे कुणाच्याही दृष्टीने व्यवहार्य नाही. आता टर्म इन्शुरन्समध्ये हेच कव्हर येत ते फक्त ₹३०,००० मग उरलेले पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा जिथे पारदर्शकता, लवचिकता आणि दीर्घकालीन परतावा दोन्ही मिळतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, ULIP मध्ये कमी परतावा का मिळतो? कारण ULIP मध्ये अनेक लपलेले खर्च असतात ज्यात पॉलिसी अ‍ॅडमिन चार्ज, मॉर्टॅलिटी चार्ज, फंड मॅनेजमेंट फी, सरेंडर चार्ज वगैरे. हे सर्व तुमच्या गुंतवणुकीचा मोठा भाग खातात. म्युच्युअल फंडामध्ये मात्र SEBIचे कडक नियम आहेत. त्यामुळे खर्चावर मर्यादा, पारदर्शकता बंधनकारक, आणि महत्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण. ULIP मध्ये अशा नियमांचा अभाव असल्याने त्याचा परिणाम थेट गुंतवणूकदारावर होतो. त्याचप्रमाणे ULIP मध्ये ५ वर्षांचा लॉक-इन असतो आणि तो “अनुशासित बचत” म्हणून दाखवला जातो. पण खरी गोष्ट अशी आहे की ते अनुशासन नसून बंदिस्तपणा आहे. समजा आपली नोकरी गेली, आजारपण आलं, किंवा आर्थिक संकट आलं तरीही तुमचे पैसे ५ वर्षे अडकून राहतात. आणि मला वाटत, खरी शिस्त म्हणजे, उद्दिष्टांशी जोडून राहणं, नाही की कॉन्ट्रॅक्टमध्ये अडकणं. ULIP मध्ये म्हणतात की मृत्यूनंतर “सम एश्योर्ड किंवा फंड व्हॅल्यू, जे जास्त असेल ते मिळेल.” हे ऐकायला छान वाटतं. पण लक्षात ठेवा ULIP मधील सम एश्योर्ड आधीपासूनच अपुरा असतो. म्हणजे तुमच्या कुटुंबाला खरं संरक्षण मिळत नाही, फक्त एक “संख्यात्मक आश्वासन” मिळतं.

मग योग्य मार्ग कोणता? यावर मी एकच गोष्ट सांगत आलो आहे, विमा आणि गुंतवणूक वेगळी ठेवा. प्रथम पुरेसं टर्म इन्शुरन्स घ्या आणि नंतर उरलेली रक्कम म्युच्युअल फंडामध्ये गुंतवा. यामुळे तुमचं कुटुंबही सुरक्षित राहील आणि संपत्तीही वाढेल. हा कॉम्बिनेशन कोणत्याही ULIP पेक्षा खूपच अधिक प्रभावी आहे.

आता यानंतर जेव्हा तुम्ही एखाद्या चार्टकडे बघाल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा “विमा आणि गुंतवणूक एकत्र का विकल्या जात आहे?” “मी दोन्ही स्वतंत्रपणे घेऊ शकत नाही का?” त्यावर उत्तर स्पष्ट मिळेल या खेळात फायदा कुणाचा, गुंतवणूकदाराचा कि कंपनीचा?

त्यामुळे अशा भ्रमात न अडकता, आपल्या गरजा, उद्दिष्टे आणि जोखीम लक्षात घेऊन योग्य सल्लागाराचा सल्ला घ्या. कारण To Create Secure Wealth — हे फक्त आमचं टॅगलाइन नाही, तर ते प्रत्येक गुंतवणूकदाराच हक्कच आहे.

आजच्या सोशल मीडिया युगात माहिती कमी आणि मार्केटिंग जास्त आहे. त्यामुळे गुंतवणूक करताना योग्य सल्लागाराची निवड करणे हेच सर्वात मोठं आर्थिक निर्णय आहे.

आपलाच
श्रीनिवास सुरेश मुळावार
Founder of Shri Absolute Wealth Management

तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा.

Address

In Front Of Mahesh Bhavan, Hanuman Nagar, Tukum
Chandrapur
442401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Absolute Wealth Management posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shri Absolute Wealth Management:

Share